पोस्ट्स

2020 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

IPL चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जर भारतात नाही तर या दोन ठिकाणी खेळवणार IPL

इमेज
IPL चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Bcci च्या एका अधिकाऱ्याने सागितले आहे की जर भारतात IPL शक्य नसल्यास श्रीलंका आणि UAE या दोन ठिकाणांचा आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे परत एकदा IPL भारताबाहेर होण्याची शक्यता आहे  भारतात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या विषाणूची रुग्णसंख्या भयंकर वाढत आहे. या मारामारी मुळे सध्या भारतात क्रिडा क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. क्रिकेट वरही याचा मोठा परिणाम झाला आहे. मार्च मध्ये सुरू होणारी IPL लांबत लांबत अजूनही निश्चित नाही. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मागे सांगितले होते की IPL भारतात खेळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण आता कोरोनाची अवस्था बघता ही स्पर्धा भारतात घेणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे आता बाहेरील जागांचा विचार केला जात आहे. काही दिवसापूर्वी श्रीलंका क्रिकेट मंडळाने IPL श्रीलंकेत खेळविण्याचा प्रस्ताव BCCI कडे पाठवला होता पण त्यावेळी BCCI ने तो प्रस्ताव नाकारला होता पण आता त्याच प्रस्तावाकडे बघण्याची गरज भासत आहे.  श्रीलंका प्रमाणे UAE नेही IPL खेळवण्यास समर्थता दर्शविली आहे.  आता BCCI कोणते पाउल उचलते याक...

भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना फिक्स होता, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्याने केले खळबळजनक आरोप

इमेज
भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना फिक्स होता, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्याने केले खळबळजनक आरोप  ,  2011 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर  झालेला भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना फिक्स होता असे खळबळजनक आरोप, श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे श्रीलंकेत आणि क्रिकेट विश्वास एकच खळबळ उडाली आहे.  काय म्हणतात माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे "त्यावेळी क्रीडामंत्री मी होतो, मला पूर्ण खात्री आहे की तो सामना फिक्स केला गेला होता. अंतिम सामना श्रीलंका जिंकू शकत होती पण सामनाच फिक्स होता यामागे काही विशिष्ट लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली ".  श्रीलंका सरकार करत आहे गांभीर्याने विचार  या अगोदर असेच काहीसे आरोप श्रीलंकेच्या माजी वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारानेही केले आहे त्यात माजी क्रीडामंत्रीही बोलल्यामुळे हे प्रकरण आहे मोठ झाल आहे. मात्र हे प्रकरण खूपच गंभीर असल्यामुळे श्रीलंका सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश दिले आहेत. आणि दोन आठवड्यात या प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगि...

मोहमद शमीच्या बायकोने केली हद्दच पार केले निर्वस्त्र फोटो पोस्ट, यावर काय म्हणाला शमी?

इमेज
  मोहमद शमीच्या बायकोने केला निर्वस्त्र फोटो पोस्ट, यावर काय म्हणाला शमी  भारताचा वेगवान गोलंदाज मोहमद शमी आणि त्याच्या पत्नी हसीन जाहान मध्ये घटस्फोट होऊनही भांडणे थांबायची काही नाव घेत नाहीत. ते दोघ आता एकत्र राहत नाहीत. हसीनने शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर याआधीही गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण न्यायालयात चालू आहे पण BCCI ने मोहमद शमीला क्लीन चिट दिली आहे त्यामुळे तो भारताकडून सामने खेळत आहे नुसता खेळतच नाही तर गाजवत आहे.  शमी आणि हसीन मध्ये खूप दिवसापासून वाद चालू आहेत. मात्र यावेळी मात्र तिने हद्द पार केली, हसीन जाहान सोशल मीडिया वर सतत काहीतरी वादग्रस्त पोस्ट टाकत असते त्यात तिने काही दिवसापूर्वी एक फोटो पोस्ट केला त्यात मोहम्मद शमी सारखा एक व्यक्ति दिसत आहे तो नक्की शमी आहे की दुसर कोण हे अजून कळले नाही त्या फोटो तो आणि हसीन निर्वस्त्र फोटो m आणि त्याच्याखाली caption (मथळा) लिहले आहे  फोटो लिंक  "जेंव्हा तुझ्याकडे काहीच नव्हते तू कोणच नव्हता तेंव्हा मी पवित्र होते आता तू कोणीतरी आहेस म्हणून मी अपवित्र झाले. खोट्याचा बुरखा घालून खर...

बेन स्टोक्सचे धोनी वर खळबळजनक आरोप "धोनीने जिंकण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत"

इमेज
बेन स्टोक्सचे धोनी वर खळबळजनक आरोप  "धोनीने जिंकण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत" बेन स्टोक्सने आपल्या पुस्तकात 2019 च्या वर्ल्ड कप सामन्यात MS धोनीवर शंका घेतली आहे. त्याच्या या विधानाने चाहत्यांमध्ये वादग्रस्त भूमिका व्यक्त होत आहेत  बेन स्टोक्सने त्याचे पुस्तक ' ऑन फायर' मध्ये 2019 च्या वर्ल्ड कप मधील भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे विश्लेषण करताना म्हटले आहे की 'MS धोनी मध्ये धावांचा पाठलाग करताना ती जिंकण्याची जिद्द दिसत नव्हती. भारत जो सामना जिंकू शकत होता तिथे त्यांनी प्रयत्न केले नाहीत. काय झाले होते नेमके 2019 च्या वर्ल्ड कप च्या साखळी फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 337 धावा केल्या होत्या. यात बेन स्टोक्सने जबरदस्त फलंदाजी करताना 54 चेंडूत 79 धावांची खेळी केली होती. प्रत्त्युत्तरात भारताने 50 षटकात 306 धावा केल्या आणि भारताने सामना 31 धावांनी गमावला. यात अखेरच्या षटकात धोनीने 31 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या होत्या.  बेन स्टोक्स म्हणाला 'भारताची फलंदाजी पाहता भारतासाठी...

शाहिद आफ्रिदीली घरचा आहेर, पाकिस्तानच्या माजी महापौरांनी काढली इज्जत

इमेज
भारतावर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर टीका करणार्‍या  माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला घरातूनच तिखट आहेर आला आहे ज्याला तो विसरू शकणार नाही. पाकिस्तान मधील माजी महापौर आरिफ अजाकिया यांनी आपल्या youtube वर आफ्रिदीच्या इज्जतीचा भाजीपाला केला. त्यांनी असे म्हणले आहे की, ज्या ठिकाणी शाहिद आफ्रिदी मदत करायला गेला होता तिथे तो 4-5 अन्नाच्या पिशव्या वाटण्यासाठी 25 सैनिकांच्या सुरक्षेत गेला होता. ज्या ठिकाणी शाहिद आफ्रिदी राहतो त्या ठिकाणी 20 वर्षापासुन पाकिस्तानी सेना लोकांवर जुलूम जबरदस्ती करत आहे, आतंकवाद पसरवला आहे आणि जो आवाज उठवतो त्याचा आवाज बंद केला जातो. याबाबत शाहिद आफ्रिदी कधीही बोलणार नाही आणि ज्या चुकीच्या भाषेत बोलतो ज्या देशाबद्दल बोलतो त्याच देशात तुम्ही IPL खेळण्यासाठी पैसे कमवण्यासाठी जातो, त्या वेळी बर तु भारताचे बूट चाटत बसतो, भारतीय खेळाडूंच्या मागेपुढे असता, त्या वेळी बरे तुम्हाला काश्मीर आठवत नाही त्या वेळी काश्मीर वर बरे जुलूम होत नाहीत. असे बोलत त्यांनी भारत - पाकिस्तान चा इतिहास पण आफ्रिदीला सांगितला. तुला इतिहासाबद्दल काही माही...

शार्दूल ठाकूरने सुरू केला सराव पण BCCI झाली नाराज काय आहे कारण

इमेज
देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे. देशातील सर्व खेळ आणि मैदाने बंद आहेत. Lockdown वाढविण्यात आले आहे. पण हे lockdown थोडे शिथिल करण्यात आले आहे.  याच Lockdown च्या चौथ्या टप्प्यात सरकारने अत्यावश्यक सेवा आणि काही उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. image याच पाश्र्वभूमीवर देशातील खेळाची मैदाने, क्रीडासंकुल सुरू करण्यात यावे जेणेकरुन खेळाडूचा पुरेसा सराव होईल.  मागच्या 2-3 महिन्यापासून कोणत्याही खेळाडूला सराव करण्यास बंदी आहे त्यामुळे सरकारने मैदाने सुरू करावीत अश्या मागणीने जोर धरला आणि सरकारने ती मागणी मान्य केली पण काही अटी घातल्या. खेळाडूंनी कधी सराव सुरू करावा यासाठी क्रीडामंत्री आणि क्रिडा संघटना यांच्यात चर्चा चालू असताना. शार्दूल ठाकूरने त्याचे घरचे म्हणजेच पालघर येथील मैदानात काल सराव सुरू केला आणि तो भारताकडून पहिला खेळाडू ठरला ज्याने कोरोना नंतर सरावास सुरुवात केली तर शार्दूल ठाकूरने कोरोना पासून बचावासाठी सर्व नियमांचे पालन केले पण त्याने सरावासाठी भारतीय क्रिकेट संघटनेची परवानगी न घेता सराव सुरू केला.  Image Source पण भारतीय क्रिक...

क्रिकेट मध्ये हार्दिक पांड्या आणि हॅट्ट्रिक षटकार काय आहे केमिस्ट्री!!!

इमेज
हार्दिक पांड्या आणि सलग तीन षटकार काय आहे केमिस्ट्री  इमाद वसीम, शादाब खान, मालिंदा पुष्पकुमारा, अॅडम झॅम्पा आणि टॉड अस्टले मध्ये काहीतरी साम्य आहे, हे सगळे फिरकी गोलंदाज आहेत पण अजून एक समानता आहे ती म्हणजे यातील सर्वाना हार्दिक च्या बॅटचा प्रसाद भेटला आहे.  म्हणजेच या पाच गोलंदाज विरुद्ध हार्दिकने सलग तीन चेंडूवर तीन षटकार मारले आहेत सगळ्यात पहिला नंबर लागला तो म्हणजे पाकिस्तानच्या इमाद वसीमचा हार्दिक पांड्या विरुद्ध इमाद वसीम  भारत विरुद्ध पाकिस्तान 4 जून 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी साखळी सामना भारताने पहिली फलंदाजी करताना जबरदस्त फलंदाजी केली डावाचे शेवटचे षटक इमाद वसीम ला देण्यात आले आणि पहिल्यांदा हार्दिक पांड्याने गोलंदाजां विरुद्ध हॅट्ट्रिक केली, पण ही हॅटट्रिक षटकाराची होती पहिल्यांदा एखाद्या गोलंदाजाला सलग तीन वेळा आकाशात बघायला लावले. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला  हार्दिक पांड्या विरुद्ध शादाब खान 18 जून 2017 भारत विरुद्ध पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने 338-4 धावांच...

सुनिल गावसकर यांना का करावी लागली महत्त्वाच्या सामन्यात डाव्या हाताने फलंदाजी ? 🤔

इमेज
तुम्ही कधी सुनील गावसकर यांनी डाव्या हाताने फलंदाजी केली  अस ऐकल किंवा बघितले आहे का ?🤔 .  तस आजकाल खूप फलंदाज स्विच हिट मारतात. म्हणजे फलंदाज त्याची हाताची बाजू बदलून फलंदाजी करतात. आजकालचे फलंदाज यात निपुण आहेत. जवळजवळ 70-80% फलंदाज याचा कधीनाकधी याचा वापर करतात पण सर्रास असे फटके ग्लेन मॅक्सवेल, जोस बटलर हे काही फलंदाज खेळतात. पण तेसुद्धा एका डावात जास्तीतजास्त 4-5 वेळा,  कधी ऐकल आहे का की फलंदाज त्याची हाताची बाजू बदलून फलंदाजी केली. नाही ना ! पण असे झाले आहे आणि तेसुद्धा सुनील गावसकर यांच्याकडून. विश्वास ठेवा सुनील गावसकर यांनी डाव्या हाताने फलंदाजी केली आहे. ही गोष्ट आहे 1981-82 रणजी करंडक सेमी फायनलची मुंबई विरुद्ध कर्नाटक.  कर्नाटकचा डावखुरा फिरकी गोलंदाज रघुराम भट्ट यांनी हवेचा फायदा घेत मुंबई च्या फलंदाजांन विरुद्ध एक जाळ तयार केल होत, त्यांना खेळण जवळजवळ अशक्य झाल होत, भट्ट यांनी पाहिल्या डावात 8 गडी बाद केले होते. सामन्याचा लेखाजोखा पाहिल्या डावात गावस्कर यांनी उजव्या हाताने फलंदाजी केली होती. आणि तेही 41 धावांवर भट्ट ...

कोरोना व्हायरस आणि जागतिक क्रिकेट वर झालेला परिणाम 😷😷

इमेज
कोरोना व्हायरस आणि जागतिक क्रिकेट वर झालेला परिणाम 😷😷 लेख गजानन भुमरे  नुकत्याच जगात थैमान घातलेल्या रोगाचं नाव म्हणजे कोरोना व्हायरस. चीन पासून सुरुवात झालेल्या या घातक विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर या रोगाने परिणाम केला आहे. सर्व जगाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.           यातून क्रीडाक्षेत्रही बचावलेला नाही.जगातील प्रत्येक खेळाला या रोगाचा फटका बसला आहे. जगातील मोठमोठ्या लीग या रोगाच्या भीतीने रद्द केला किंवा पुढे ढककल्या आहेत. जगातली नावाजलेली NBA बास्केटबॉल लीग सुद्दा या कोरोना व्हायरस मुळे रद्द करावी लागली. याचा परिणाम फुटबॉलवरही झाला व मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय सामने रद्द करावे लागले.याव्यतिरिक्त इतर सर्व खेळांनाही कोरोना व्हायरस चा जबरदस्त फटका बसला.   आता आपण जाणून घेणार आहोत की क्रिकेटवर कोरोना व्हायरस चा काय परिणाम झाला. भारतात कोरोना व्हायरस अगोदरच दाखल झाला होता,पण त्याची तीव्रता एवढी नव्हती की क्रिकेटचे सामने रद्द करण्यात येतील.भारतात सर्वात पहिल्यांदा कोरोना मुळे सामना रद्द करण्...

सेमीफायनल मुकाबला भारतासाठी जाणार अवघड भारतासमोर आहे कोणते संकट

इमेज
सेमीफायनल मुकाबला भारतासाठी जाणार अवघड भारतासमोर आहे कोणते संकट  लेख गजानन भुमरे  भारतीय महिला संघाने T20 वर्ल्ड कप 2020 मध्ये जबरदस्त कामगिरी करताना वर्ल्ड कप च्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. अ गटातील सर्वच्या सर्व म्हणजे चार सामने जिंकून भारतीय महिला संघाने गटात अव्वल स्थान पटकावले. पाहिल्या सामन्यात भारतीय संघाने पूनम यादवच्या शानदार फिरकीमुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवून लावले, तर दुसर्‍या सामन्यात शेजारी बांगलादेशला 18 धावांनी पराभूत केले. तिसर्‍या सामन्यातही भारताला प्रथम फलंदाजी मिळाली रंगतदार झालेल्या सामन्यात केवळ 3 धावांनी न्यूझीलंड वर रोमांचक विजय मिळविला. चौथ्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताला प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाली या मॅच मधेही भारतीय महिलांचे वर्चस्व राखत 7 विकेट ने दणदणीत विजय मिळविला.  आता भारतीय संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला आहे. भारतासमोर इंग्लंड चे आव्हान आहे. आणि भारतासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे.ते संकट म्हणजे आतापर्यंत भारताने सेमी फायनल मधे कधीही विजय मिळवला नाही. टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त...

वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात विश्वविजेत्यांना दणका, भारतीय महिला संघाची जबरदस्त कामगिरी

इमेज
महिला टी-20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघावर 17 धावांनी दणदणीत विजय मिळवून वर्ल्ड कपचा विजयी शुभारंभ केला  लेख गजानन भुमरे  शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.   प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने चार षटकांमध्ये 40 धावांची दमदार सलामी दिली, यानंतर पाचव्या शतकात स्मृती मनधना फटकेबाजी च्या नादात बाद झाली,तर पुढच्याच षटकात दमदार फलंदाजी करीत असलेल्या शेफाली वर्माला एलिसा पेरीने माघारी धाडले यापाठोपाठ भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर स्वस्तात तंबूत परतली. दीप्ती शर्मा व जेमीमाह रॉड्रिगेस यांनी संयमी फलंदाजी करीत भारताचा डाव सावरला. अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर जेमीमाह तंबूत परतली. दीप्ती शर्माने एक बाजू लावून धरत 49 धावांवर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाकडून जेश जेनासन हीने दोन गडी टिपले, तर एलीस पेरी आणि किमींस यांनी एकेक गडी टिपला. निर्धारित 20 षटकात भारतीय संघाने 132 धावा केल्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पावर प्ले मध्ये संयमी सुरुवात केली. शिखा पां...