भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना फिक्स होता, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्याने केले खळबळजनक आरोप
भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना फिक्स होता, श्रीलंकेच्या माजी क्रीडामंत्र्याने केले खळबळजनक आरोप
2011 मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम सामना फिक्स होता असे खळबळजनक आरोप, श्रीलंकेचे माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपामुळे श्रीलंकेत आणि क्रिकेट विश्वास एकच खळबळ उडाली आहे.
काय म्हणतात माजी क्रीडामंत्री महिंदानंद अलुथगमगे
"त्यावेळी क्रीडामंत्री मी होतो, मला पूर्ण खात्री आहे की तो सामना फिक्स केला गेला होता. अंतिम सामना श्रीलंका जिंकू शकत होती पण सामनाच फिक्स होता यामागे काही विशिष्ट लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली ".
श्रीलंका सरकार करत आहे गांभीर्याने विचार
या अगोदर असेच काहीसे आरोप श्रीलंकेच्या माजी वर्ल्ड कप विजेत्या कर्णधारानेही केले आहे त्यात माजी क्रीडामंत्रीही बोलल्यामुळे हे प्रकरण आहे मोठ झाल आहे.
मात्र हे प्रकरण खूपच गंभीर असल्यामुळे श्रीलंका सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याची आदेश दिले आहेत. आणि दोन आठवड्यात या प्रकरणी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
याआधी अर्जुन रणतुंगानेही केले होते आरोप
तीन वर्षापूर्वी श्रीलंकेचा माजी वर्ल्ड कप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा याने अंतिम सामन्यावर टीका केली होती. तो म्हणाला होता
"जेंव्हा 2011 च्या अंतिम सामन्यात श्रीलंका हरली तेंव्हा मी खूप दुःखी होतो पण या सामन्यात मला संशय आला होता, श्रीलंका का पराभूत झाली याची चौकशी व्यायला हवी, मी आता काही बोलणार नाही पण एके दिवशी सगळा खुलासा करेन"
माजी खेळाडूंनी फेटाळून लावले आरोप
मात्र 2011 मध्ये श्रीलंकेचा कर्णधार असलेल्या कुमार संगकारा आणि महेला जयवर्धने यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. आणि पुरावे सादर करण्याची मागणी केली आहे.
काय म्हणाला कुमार संगकारा
" त्याला त्याचा पुरावा आयसीसी आणि भ्रष्टाचारविरोधी सुरक्षा विभागाकडे नेण्याची गरज आहे.
जेणेकरून दाव्यांची चौकशी त्यांच्याकडून होऊ शकेल"
काय म्हणाला महेला जयवर्धने
"निवडणुका जवळ आल्या आहेत वाटत
सर्कस सुरू झाल्यासारखे दिसत आहे
नाव आणि पुरावे? 🤔"
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा