क्रिकेट मध्ये हार्दिक पांड्या आणि हॅट्ट्रिक षटकार काय आहे केमिस्ट्री!!!

हार्दिक पांड्या आणि सलग तीन षटकार काय आहे केमिस्ट्री


 इमाद वसीम, शादाब खान, मालिंदा पुष्पकुमारा, अॅडम झॅम्पा आणि टॉड अस्टले मध्ये काहीतरी साम्य आहे, हे सगळे फिरकी गोलंदाज आहेत पण अजून एक समानता आहे ती म्हणजे यातील सर्वाना हार्दिक च्या बॅटचा प्रसाद भेटला आहे. 
म्हणजेच या पाच गोलंदाज विरुद्ध हार्दिकने सलग तीन चेंडूवर तीन षटकार मारले आहेत

सगळ्यात पहिला नंबर लागला तो म्हणजे पाकिस्तानच्या इमाद वसीमचा

हार्दिक पांड्या विरुद्ध इमाद वसीम 
भारत विरुद्ध पाकिस्तान
4 जून 2017
चॅम्पियन्स ट्रॉफी साखळी सामना
भारताने पहिली फलंदाजी करताना जबरदस्त फलंदाजी केली डावाचे शेवटचे षटक इमाद वसीम ला देण्यात आले आणि पहिल्यांदा हार्दिक पांड्याने गोलंदाजां विरुद्ध हॅट्ट्रिक केली, पण ही हॅटट्रिक षटकाराची होती पहिल्यांदा एखाद्या गोलंदाजाला सलग तीन वेळा आकाशात बघायला लावले. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला 

हार्दिक पांड्या विरुद्ध शादाब खान
18 जून 2017
भारत विरुद्ध पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना
पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने 338-4 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात भारताची अवस्था 72-6 अशी झाली होती. 23 व्या षटकात चौकार मारल्यानंतर परत हार्दिक पांड्याने षटकाराची हॅट्ट्रिक केली. या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांना पांड्याने हतबल करून सोडले होते. पण रविन्द्र जडेजा सोबत हार्दिक धावबाद झाला ही गोष्ट भारतीय क्रिकेट प्रेमींना अजूनही सलत आहे. या सामन्यात भारताचा पराभव झाला. आणि पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी वर आपले नाव कोरले.


हार्दिक पांड्या विरुद्ध मालिंदा पुष्पकुमारा
12 ऑगस्ट 2017
भारत विरुद्ध श्रीलंका
तिसरा कसोटी सामना
पाहिल्या डावात हार्दिक पांड्या जबरदस्त फलंदाजी करत होता, त्यावेळी त्याच्यासमोर 116 व्या षटकात मालिंदा पुष्पकुमारा आला आणि आता फक्त क्रिकेटचा प्रकार बदलला होता हार्दिक नाही. परत एकदा तीन चेंडूवर तीन गगनचुंबी षटकार लगावले याच सामन्यात हार्दिकने पहिलेवहिले शतक झळकावले. भारताने हा सामना एक डाव आणि 171 धावांनी सहज जिंकला
हार्दिक पांड्या विरुद्ध अॅडम झॅम्पा
17 सप्टेंबर 2017
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला एकदिवसीय सामना
37 वे षटक या लेग स्पिनरच्या षटकात चौकार मारल्यानंतर हार्दिकने सलग तीन चेंडूवर तीन षटकार खेचले.या षटकात 24 धावा काढल्या. या अष्टपैलू खेळाडूच्या शेवटच्या क्षणी केलेल्या जबरदस्त फलंदाजीने भारत 50 षटकात 281 धावा केल्या.
66 चेंडूत 83 धावा फटकावून गोलंदाजीत 2 बळी पण घेतले आणि भारताला विजय मिळवून दिला

हार्दिक पांड्या विरुद्ध टॉड अस्टले
3 फेब्रुवारी 2019
भारत विरुद्ध न्यूझीलंड
पाचवा एकदिवसीय सामना
पहिल्यांदा फलंदाजी करताना किवींच्या वेगवान मार्‍यासमोर भारताची अवस्था 18-4 अशी झाली होती पण यानंतर भारताने सावरत 46 षटकात 205-7 धावा केल्या पण डावाच्या 47 व्या षटकात टॉड अस्टले समोर पांड्याने आक्रमक रूप धारण केले आणि सलग तीन चेंडूवर तीन षटकार मारले आणि केवळ 22 चेंडूत 45 धावा केल्या 
त्याच्या या शेवटच्या षटकातील हाणामारी मुळे भारताने 50 षटकात 252 धावा केल्या आणि न्यूझीलंड वर 35 धावांनी विजय मिळविला

तुम्हाला काय वाटते या सूचित अजून कोणकोणत्या गोलंदाजाचे नाव जोडले जाईल Comment करा
आणि हार्दिक पांड्या सलग सहा चेंडूवर सहा षटकार मारू शकेल का 🤔?!

टिप्पण्या

  1. नक्कीच मारणार 🙌🏼🔥 हार्दिक मध्ये ती सहा षटकार मारण्याची धमक आहे आणि तो नक्कीच हे काम करील 💯☑️

    उत्तर द्याहटवा
  2. हार्दिक ची बॅटिंग मधील आक्रमकता पाहता तो लवकरच 6 चेंडूवर 6 षटकार लावेल💯🏏🔥

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेशिस्तपणा भोवला, हरमनप्रीत कौर 2 सामन्यांसाठी निलंबित

"मी भारतात जाणार नाही, कोणतीही शक्यता नाही" मोइन अली

जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन, आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपदी निवड