शार्दूल ठाकूरने सुरू केला सराव पण BCCI झाली नाराज काय आहे कारण
देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे. देशातील सर्व खेळ आणि मैदाने बंद आहेत. Lockdown वाढविण्यात आले आहे. पण हे lockdown थोडे शिथिल करण्यात आले आहे.
याच Lockdown च्या चौथ्या टप्प्यात सरकारने अत्यावश्यक सेवा आणि काही उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
याच पाश्र्वभूमीवर देशातील खेळाची मैदाने, क्रीडासंकुल सुरू करण्यात यावे जेणेकरुन खेळाडूचा पुरेसा सराव होईल.
मागच्या 2-3 महिन्यापासून कोणत्याही खेळाडूला सराव करण्यास बंदी आहे त्यामुळे सरकारने मैदाने सुरू करावीत अश्या मागणीने जोर धरला आणि सरकारने ती मागणी मान्य केली पण काही अटी घातल्या.
खेळाडूंनी कधी सराव सुरू करावा यासाठी क्रीडामंत्री आणि क्रिडा संघटना यांच्यात चर्चा चालू असताना. शार्दूल ठाकूरने त्याचे घरचे म्हणजेच पालघर येथील मैदानात काल सराव सुरू केला आणि तो भारताकडून पहिला खेळाडू ठरला ज्याने कोरोना नंतर सरावास सुरुवात केली
तर शार्दूल ठाकूरने कोरोना पासून बचावासाठी सर्व नियमांचे पालन केले पण त्याने सरावासाठी भारतीय क्रिकेट संघटनेची परवानगी न घेता सराव सुरू केला.
पण भारतीय क्रिकेट संघटना मात्र यामुळे शार्दूल ठाकूरवर नाराज आहे.
त्याची कारणे अशी आहेत
शार्दूल ठाकूर हा BCCI च्या करारात येणारा खेळाडू आहे त्यामुळे त्याने BCCI ची परवानगी घेणे आवश्यक आहे.
सरावासाठी उतरण्या अगोदर त्याने Medical Certificate काढणे गरजेचे आहे
आणि ठाकूर राहत असलेल ठिकाण म्हणजे मुंबई, पालघर हे अजूनही रेड झोन मध्ये येते त्यामुळे रेड झोन मध्ये येणार्या खेळाडुंना सरावासाठी सध्या बंदी आहे
आणि शार्दूल ठाकूरने BCCI ला न विचारता सराव सुरू केल्यामुळे BCCI ठाकूर वर नाराज आहे आणि मला या बाबत BCCI बरोबर वाटत आहे तुम्हाला काय वाटते नक्की comment करा
आणि Blog कसा वाटला हे पण Comment करा 😍🙏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा