सुनिल गावसकर यांना का करावी लागली महत्त्वाच्या सामन्यात डाव्या हाताने फलंदाजी ? 🤔
तुम्ही कधी सुनील गावसकर यांनी डाव्या हाताने फलंदाजी केली
अस ऐकल किंवा बघितले आहे का ?🤔
.
तस आजकाल खूप फलंदाज स्विच हिट मारतात. म्हणजे फलंदाज त्याची हाताची बाजू बदलून फलंदाजी करतात. आजकालचे फलंदाज यात निपुण आहेत. जवळजवळ 70-80% फलंदाज याचा कधीनाकधी याचा वापर करतात पण सर्रास असे फटके ग्लेन मॅक्सवेल, जोस बटलर हे काही फलंदाज खेळतात. पण तेसुद्धा एका डावात जास्तीतजास्त 4-5 वेळा,
कधी ऐकल आहे का की फलंदाज त्याची हाताची बाजू बदलून फलंदाजी केली. नाही ना !
पण असे झाले आहे आणि तेसुद्धा सुनील गावसकर यांच्याकडून. विश्वास ठेवा सुनील गावसकर यांनी डाव्या हाताने फलंदाजी केली आहे. ही गोष्ट आहे 1981-82 रणजी करंडक सेमी फायनलची मुंबई विरुद्ध कर्नाटक. कर्नाटकचा डावखुरा फिरकी गोलंदाज रघुराम भट्ट यांनी हवेचा फायदा घेत मुंबई च्या फलंदाजांन विरुद्ध एक जाळ तयार केल होत, त्यांना खेळण जवळजवळ अशक्य झाल होत, भट्ट यांनी पाहिल्या डावात 8 गडी बाद केले होते.
पाहिल्या डावात गावस्कर यांनी उजव्या हाताने फलंदाजी केली होती. आणि तेही 41 धावांवर भट्ट याचे शिकार बनले. पाहिल्या डावात भट्ट याना खेळायला खूप अडचण येत होती मुंबईचा पहिला डाव 271 धावात संपला
आणि याच्या प्रत्त्युत्तरात कर्नाटकने 470 धावा केल्या
मुंबईच्या दुसर्या डावात रघुराम भट्ट यांची गोलंदाजी अजूनच तिखट झाली पाहिल्या 6 बळीत त्यांनी 4 गडी गारद केले होते. मुंबईची धावसंख्या 160-6 अशी होती आणि पराभव उंबरठ्यावर होता
यानंतर फलंदाजीला आलेल्या सुनील गावस्कर यांनी वेगळीच शक्कल लढवली आणि डाव्या हाताने फलंदाजी करायला लागले. कुणाला काहीच समजत नव्हते की गावस्कर असे का करत आहेत.
भट्ट याची गोलंदाजी सोडली तर ते बाकी गोलंदाजांना उजव्या हाताने फलंदाजी करत. दुसर्या बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत होत्या पण गावस्कर शेवटपर्यंत नाबाद राहिले. मुंबईच्या 9 पडल्या आणि सामना वाचविण्यात मुंबईला (सुनील गावस्कर) यश आले.
सामना वाचवला असला तरी पाहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर कर्नाटकने अंतिम फेरीत प्रवेश केला.
या सामन्यात सुनील गावसकर यांनी एका तासापेक्षा जास्त वेळ डाव्या हाताने फलंदाजी केली. तर रघुराम भट्ट यांनी सामन्यात 13 बळी घेतले.
82 प्रथम श्रेणी सामन्यात 22.66 च्या सरासरीने 374 बळी घेणार्या भट्ट यांना 1983 मध्ये भारताकडून 2 कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली पण 2 सामन्यात केवळ 4 बळी मिळाल्यामुळे त्यांच आंतराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली. यानंतर त्यांनी प्रशिक्षण आणि पंच यात कारकीर्द सुरू केली.
कस वाटले हा लेख वाचून नक्की comment करा
जर रघुराम भट्ट यांना अजून संधी द्यायला हवी होती का 🤔 Comment द्वारे सांगा
🙏🙏🙏🙏
Apratim ☺️
उत्तर द्याहटवा