वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात विश्वविजेत्यांना दणका, भारतीय महिला संघाची जबरदस्त कामगिरी
महिला टी-20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघावर 17 धावांनी दणदणीत विजय मिळवून वर्ल्ड कपचा विजयी शुभारंभ केला
लेख गजानन भुमरे
शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने चार षटकांमध्ये 40 धावांची दमदार सलामी दिली, यानंतर पाचव्या शतकात स्मृती मनधना फटकेबाजी च्या नादात बाद झाली,तर पुढच्याच षटकात दमदार फलंदाजी करीत असलेल्या शेफाली वर्माला एलिसा पेरीने माघारी धाडले यापाठोपाठ भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर स्वस्तात तंबूत परतली. दीप्ती शर्मा व जेमीमाह रॉड्रिगेस यांनी संयमी फलंदाजी करीत भारताचा डाव सावरला. अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर जेमीमाह तंबूत परतली. दीप्ती शर्माने एक बाजू लावून धरत 49 धावांवर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाकडून जेश जेनासन हीने दोन गडी टिपले, तर एलीस पेरी आणि किमींस यांनी एकेक गडी टिपला. निर्धारित 20 षटकात भारतीय संघाने 132 धावा केल्या
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पावर प्ले मध्ये संयमी सुरुवात केली. शिखा पांडेने बेथ मूनीला 6 धावांच्या वैयक्तीक धावसंख्येवर माघारी पाठवले. ऑस्ट्रेलियन महिलांची जबरदस्त फलंदाजी चालू होती पण नवव्या षटकात राजेश्वरी गायकवाडने मॅग लेनीनला आपल्या फिरकीत फसवले. तर दुसऱ्या बाजूने एलिसा हिली जबरदस्त फलंदाजी करत अजून एक शानदार आक्रमक अर्धशतक झळकावले. नवव्या षटकात ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 गडी बाद 67 धावा अशी होती. पण यानंतर भारतीय फिरकी गोलंदाज पूनम यादवने आपली जादू दाखवायला सुरुवात केली तिने पहिल्यांदा भारताच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या एलिसा हिली ला स्व:ताच्याच गोलंदाजी वर झेल घेत तंबूत पाठवले
सामन्यात खरी मजा आली ती बाराव्या षटकात यादवच्या गोलंदाजीवर पुढे सरसावून फटका मारण्याची चूक रिचल हायनेस ला महागात पडली आणि ती यष्टीचीत झाली यानंतर आलेल्या पेरीनेही जणूकाही action replay केला. दोन चेंडूवर दोन गडी बाद केल्यानंतर एकदमच भारतीय संघ सामन्यात परतला तिसर्या चेंडूवर पूनम यादवला हॅट्ट्रिक ची संधी होती पूनमने जबरदस्त गूगली टाकून जेश जेनासनला चुकवले होते पण यष्टीरक्षक तनया भाटियाने झेल सोडला आणि हॅटट्रिक होता होता राहिली या षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची अवस्था 76-5 गडी बाद होती
गार्डनर एक बाजूने लढत होती पण दुसर्या बाजूने ठराविक अंतराने विकेट पडत होत्या. ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला भारताने जास्त वळवळू दिले नाही आणि ऑस्ट्रेलियाला 115 धावात सर्वबाद करून वर्ल्ड कप ची सुरुवात दमदार केली भारताकडून पूनम यादवने 19 धावात 4 विकेट घेतल्या तर शिखा पांडेने 14 धावात 3 बळी घेत दमदार साथ दिली राजेश्वरी गायकवाडने एक बळी मिळवला पूनम यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले
यजमानांना नमवल्यानंतर भारताची दुसरी लढत बांगलादेश विरुद्ध सोमवारी होणार आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा