IPL चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, जर भारतात नाही तर या दोन ठिकाणी खेळवणार IPL

IPL चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Bcci च्या एका अधिकाऱ्याने सागितले आहे की जर भारतात IPL शक्य नसल्यास श्रीलंका आणि UAE या दोन ठिकाणांचा आम्ही विचार करत आहोत. त्यामुळे परत एकदा IPL भारताबाहेर होण्याची शक्यता आहे 


भारतात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस या विषाणूची रुग्णसंख्या भयंकर वाढत आहे. या मारामारी मुळे सध्या भारतात क्रिडा क्षेत्र पूर्णपणे बंद आहे. क्रिकेट वरही याचा मोठा परिणाम झाला आहे. मार्च मध्ये सुरू होणारी IPL लांबत लांबत अजूनही निश्चित नाही.

BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मागे सांगितले होते की IPL भारतात खेळवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत. पण आता कोरोनाची अवस्था बघता ही स्पर्धा भारतात घेणे जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे आता बाहेरील जागांचा विचार केला जात आहे.

काही दिवसापूर्वी श्रीलंका क्रिकेट मंडळाने IPL श्रीलंकेत खेळविण्याचा प्रस्ताव BCCI कडे पाठवला होता पण त्यावेळी BCCI ने तो प्रस्ताव नाकारला होता पण आता त्याच प्रस्तावाकडे बघण्याची गरज भासत आहे. 
श्रीलंका प्रमाणे UAE नेही IPL खेळवण्यास समर्थता दर्शविली आहे. 
आता BCCI कोणते पाउल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


जर IPL भारतात झाली नाही तर BCCI ला कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे भारतात क्रिकेट वरही परिणाम होईल. त्यामुळे भारतात IPL खेळवणे यावर BCCI ठाम होती. पण अशी चिन्हे आता दिसत नाहीत त्यामुळे पूर्ण नुकसान होण्याऐवजी थोडे नुकसान BCCI मान्य करेल. आणि IPL श्रीलंका किंवा UAE या दोन ठिकाणी खेळवण्याची शक्यता आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेशिस्तपणा भोवला, हरमनप्रीत कौर 2 सामन्यांसाठी निलंबित

"मी भारतात जाणार नाही, कोणतीही शक्यता नाही" मोइन अली

जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन, आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपदी निवड