बेशिस्तपणा भोवला, हरमनप्रीत कौर 2 सामन्यांसाठी निलंबित
बेशिस्तपणा भोवला, हरमनप्रीत कौर 2 सामन्यांसाठी निलंबित
सामन्यात, तिला पायचीत घोषित केल्यानंतर, कौरने तिच्या बॅटने तिचे स्टंप उडवले आणि सामन्यानंतरच्या सादरीकरणात पंचाना "निंदनीय" म्हटले. या दोन घटनांसाठी तीला निलंबित केले आहे असे ICC च्या नुकत्याच जाहीर झालेल्या प्रकाशनात स्पष्ट केले आहे.
भारताच्या डावाच्या 34 व्या षटकात ऑफ स्पिनर नाहिदा अक्टरला स्लिपमध्ये झेलबाद झाल्यामुळे कौरने तिच्या बॅटने विकेट्स मारून बाद झाल्यानंतर निराशा व्यक्त केल्यावर विशेषत: पहिली घटना घडली तर दुसऱ्या घटनेत सामन्याच्या सादरीकरणात पंचावर उघडपणे टीका केली.
लेव्हल 2 च्या उल्लंघनात खेळाडूच्या मॅच फीच्या 50 ते 100 टक्के आणि तीन किंवा चार दोषी गुणांचा (डिमेरिट पॉइंट्सचा) दंड आकारला जातो तर लेव्हल 1 च्या उल्लंघनात कमीत कमी खेळाडूच्या मॅच फीच्या 25-50 टक्के जास्तीत जास्त दंड आणि एक किंवा दोन डिमेरिट पॉइंट्स आहेत.
पहिल्या घटनेत ती लेव्हल 2 च्या गुन्ह्यासाठी मॅच फी च्या 50 टक्के दंड ठोठावण्यात आला आणि तिच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डवर तिला तीन डिमेरिट गुण मिळाले. ती खेळाडू आणि खेळाडू सपोर्ट कर्मचार्यांसाठीच्या ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.8 चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळली, म्हणजे अंपायरच्या निर्णयावर असहमत दर्शवणे" संबंधित . तर दुसऱ्या घटनेसाठी लेव्हल 1 च्या गुन्ह्यासाठी तीला मॅच फी च्या 25 % तर एक डिमेरिट गुण मिळाला. अश्या प्रकारे सामन्यानंतर हरमनला 75% दंड आणि 4 डिमेरिट गुण मिळाले.
कौरचे चार डिमेरिट गुण दोन सामन्याच्या निलंबनात बदलतात. निलंबनाचे गुणामुळे एक कसोटी किंवा दोन ODI किंवा दोन T20I सामन्यांत बंदी येते , कौरला भारताच्या आगामी 2 सामन्यांमधून निलंबित केले जाणार आहे.
..
Are bhai aaj match Nahin dikh rahi hai yaar
उत्तर द्याहटवाAbhi dikh rha hai
हटवा