एकाच फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज
एकाच फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज
इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरची विकेट घेतली. ब्रॉड च्या चेंडूचा बचाव करताना वॉर्नरला जॅक क्रॉलीने झेलबाद केले. फक्त 5 चेंडू खेळून वॉर्नरने केवळ एक धाव काढता आली. खरंच, वॉर्नरला ब्रॉडसमोर त्याची विकेट टिकवणे कधीही सोपे गेले नाहीय.
ऍशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टुअर्ट ब्रॉडने डेव्हिड वॉर्नरला कसोटीत १७ व्यांदा बाद केले, ही मोठी उपलब्धी आहे. ब्रॉड आता अशी कामगिरी करणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे, कारण एकाच फलंदाजाला सर्वाधिक बाद करण्याचा विक्रम ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे
मायकेल अथर्टनला ग्लेन मॅकग्राने १९ वेळा बाद केले. या प्रकरणात, बेडसरचे नाव दुसरे आहे, ज्याने आर्थर मॉरिसला 18 वेळा बाद केले आणि आता या यादीत स्टुअर्ट ब्रॉडचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आले आहे. या बाबतीत त्याने कर्टली अॅम्ब्रोस आणि कोर्टनी वॉल्श यांची बरोबरी केली आहे.
कर्टली अॅम्ब्रोसने इंग्लंडच्या मायकेल अथर्टनला १७ वेळा बाद केले होते, तर कोर्टनी वॉल्शनेही १७ वेळा इंग्लंडच्या मायकेल अथर्टनला बाद केले होते आणि आता ब्रॉडने डेव्हिड वॉर्नरला ५१ डावांत १७ वेळा बाद केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा