स्टुअर्ट ब्रॉडची पत्नी आहे या क्रिकेटरची फॅन, नवऱ्याला म्हणाली -'तुम्ही नंबर दोनवर आहात'
स्टुअर्ट ब्रॉडची पत्नी आहे या क्रिकेटरची फॅन, नवऱ्याला म्हणाली -'तुम्ही नंबर दोनवर आहात'
वोक्सने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऍशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागन केले आणि हेडिंग्ले येथे इंग्लंडच्या तीन विकेट्सने विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 34 वर्षीय खेळाडूने सहा विकेट्स घेतल्या आणि चौथ्या डावात नाबाद 32 धावा केल्या आणि इंग्लंड संघाला चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाच्या 251 धावांच्या भक्कम धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करता आला.
ब्रॉड म्हणाला "ख्रिस वोक्स एक अद्भुत क्रिकेटर आहे. माझी पत्नी मॉलीने मला सांगितले की तो तिचा आवडता खेळाडू आहे, ज्याला मी उत्तर दिले, 'माझ्याबद्दल काय?' त्यावर ती म्हणाली, 'तुम्ही दुसरे आहात.' 'मी तिला म्हणालो तुमचे खूप आभार. मी ख्रिसची भरपूर प्रशंसा करु शकतो ती म्हणजे त्याने दोन विश्वचषक फायनल जिंकण्यात मदत केली आहे, परंतु गेल्या आठवड्यात हेडिंग्ले येथे त्याचा सर्वात महत्त्वाचा सामना होता त्यात त्याने अष्टपैलू योगदान दिले"
जर आपण ब्रॉडबद्दल बोलायचं तर तो 600 कसोटी विकेट्सच्या जवळ आहे सध्या त्याचे लक्ष इंग्लंडकडून क्रिकेट खेळण्यावर आहे. तो म्हणाला, “या उन्हाळ्यात जेव्हा मी ५७६ कसोटी विकेट्स घेऊन सुरुवात केली तेव्हा मला वाटले नव्हते की मी ६०० च्या जवळ जाईन.
Kdkkk
उत्तर द्याहटवा