पोस्ट्स

मे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बेन स्टोक्सचे धोनी वर खळबळजनक आरोप "धोनीने जिंकण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत"

इमेज
बेन स्टोक्सचे धोनी वर खळबळजनक आरोप  "धोनीने जिंकण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत" बेन स्टोक्सने आपल्या पुस्तकात 2019 च्या वर्ल्ड कप सामन्यात MS धोनीवर शंका घेतली आहे. त्याच्या या विधानाने चाहत्यांमध्ये वादग्रस्त भूमिका व्यक्त होत आहेत  बेन स्टोक्सने त्याचे पुस्तक ' ऑन फायर' मध्ये 2019 च्या वर्ल्ड कप मधील भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे विश्लेषण करताना म्हटले आहे की 'MS धोनी मध्ये धावांचा पाठलाग करताना ती जिंकण्याची जिद्द दिसत नव्हती. भारत जो सामना जिंकू शकत होता तिथे त्यांनी प्रयत्न केले नाहीत. काय झाले होते नेमके 2019 च्या वर्ल्ड कप च्या साखळी फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 337 धावा केल्या होत्या. यात बेन स्टोक्सने जबरदस्त फलंदाजी करताना 54 चेंडूत 79 धावांची खेळी केली होती. प्रत्त्युत्तरात भारताने 50 षटकात 306 धावा केल्या आणि भारताने सामना 31 धावांनी गमावला. यात अखेरच्या षटकात धोनीने 31 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या होत्या.  बेन स्टोक्स म्हणाला 'भारताची फलंदाजी पाहता भारतासाठी...

शाहिद आफ्रिदीली घरचा आहेर, पाकिस्तानच्या माजी महापौरांनी काढली इज्जत

इमेज
भारतावर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर टीका करणार्‍या  माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला घरातूनच तिखट आहेर आला आहे ज्याला तो विसरू शकणार नाही. पाकिस्तान मधील माजी महापौर आरिफ अजाकिया यांनी आपल्या youtube वर आफ्रिदीच्या इज्जतीचा भाजीपाला केला. त्यांनी असे म्हणले आहे की, ज्या ठिकाणी शाहिद आफ्रिदी मदत करायला गेला होता तिथे तो 4-5 अन्नाच्या पिशव्या वाटण्यासाठी 25 सैनिकांच्या सुरक्षेत गेला होता. ज्या ठिकाणी शाहिद आफ्रिदी राहतो त्या ठिकाणी 20 वर्षापासुन पाकिस्तानी सेना लोकांवर जुलूम जबरदस्ती करत आहे, आतंकवाद पसरवला आहे आणि जो आवाज उठवतो त्याचा आवाज बंद केला जातो. याबाबत शाहिद आफ्रिदी कधीही बोलणार नाही आणि ज्या चुकीच्या भाषेत बोलतो ज्या देशाबद्दल बोलतो त्याच देशात तुम्ही IPL खेळण्यासाठी पैसे कमवण्यासाठी जातो, त्या वेळी बर तु भारताचे बूट चाटत बसतो, भारतीय खेळाडूंच्या मागेपुढे असता, त्या वेळी बरे तुम्हाला काश्मीर आठवत नाही त्या वेळी काश्मीर वर बरे जुलूम होत नाहीत. असे बोलत त्यांनी भारत - पाकिस्तान चा इतिहास पण आफ्रिदीला सांगितला. तुला इतिहासाबद्दल काही माही...

शार्दूल ठाकूरने सुरू केला सराव पण BCCI झाली नाराज काय आहे कारण

इमेज
देशात कोरोनाने हाहाकार माजला आहे. देशातील सर्व खेळ आणि मैदाने बंद आहेत. Lockdown वाढविण्यात आले आहे. पण हे lockdown थोडे शिथिल करण्यात आले आहे.  याच Lockdown च्या चौथ्या टप्प्यात सरकारने अत्यावश्यक सेवा आणि काही उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे. image याच पाश्र्वभूमीवर देशातील खेळाची मैदाने, क्रीडासंकुल सुरू करण्यात यावे जेणेकरुन खेळाडूचा पुरेसा सराव होईल.  मागच्या 2-3 महिन्यापासून कोणत्याही खेळाडूला सराव करण्यास बंदी आहे त्यामुळे सरकारने मैदाने सुरू करावीत अश्या मागणीने जोर धरला आणि सरकारने ती मागणी मान्य केली पण काही अटी घातल्या. खेळाडूंनी कधी सराव सुरू करावा यासाठी क्रीडामंत्री आणि क्रिडा संघटना यांच्यात चर्चा चालू असताना. शार्दूल ठाकूरने त्याचे घरचे म्हणजेच पालघर येथील मैदानात काल सराव सुरू केला आणि तो भारताकडून पहिला खेळाडू ठरला ज्याने कोरोना नंतर सरावास सुरुवात केली तर शार्दूल ठाकूरने कोरोना पासून बचावासाठी सर्व नियमांचे पालन केले पण त्याने सरावासाठी भारतीय क्रिकेट संघटनेची परवानगी न घेता सराव सुरू केला.  Image Source पण भारतीय क्रिक...

क्रिकेट मध्ये हार्दिक पांड्या आणि हॅट्ट्रिक षटकार काय आहे केमिस्ट्री!!!

इमेज
हार्दिक पांड्या आणि सलग तीन षटकार काय आहे केमिस्ट्री  इमाद वसीम, शादाब खान, मालिंदा पुष्पकुमारा, अॅडम झॅम्पा आणि टॉड अस्टले मध्ये काहीतरी साम्य आहे, हे सगळे फिरकी गोलंदाज आहेत पण अजून एक समानता आहे ती म्हणजे यातील सर्वाना हार्दिक च्या बॅटचा प्रसाद भेटला आहे.  म्हणजेच या पाच गोलंदाज विरुद्ध हार्दिकने सलग तीन चेंडूवर तीन षटकार मारले आहेत सगळ्यात पहिला नंबर लागला तो म्हणजे पाकिस्तानच्या इमाद वसीमचा हार्दिक पांड्या विरुद्ध इमाद वसीम  भारत विरुद्ध पाकिस्तान 4 जून 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी साखळी सामना भारताने पहिली फलंदाजी करताना जबरदस्त फलंदाजी केली डावाचे शेवटचे षटक इमाद वसीम ला देण्यात आले आणि पहिल्यांदा हार्दिक पांड्याने गोलंदाजां विरुद्ध हॅट्ट्रिक केली, पण ही हॅटट्रिक षटकाराची होती पहिल्यांदा एखाद्या गोलंदाजाला सलग तीन वेळा आकाशात बघायला लावले. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर सहज विजय मिळवला  हार्दिक पांड्या विरुद्ध शादाब खान 18 जून 2017 भारत विरुद्ध पाकिस्तान, चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामना पहिली फलंदाजी करताना पाकिस्तानने 338-4 धावांच...

सुनिल गावसकर यांना का करावी लागली महत्त्वाच्या सामन्यात डाव्या हाताने फलंदाजी ? 🤔

इमेज
तुम्ही कधी सुनील गावसकर यांनी डाव्या हाताने फलंदाजी केली  अस ऐकल किंवा बघितले आहे का ?🤔 .  तस आजकाल खूप फलंदाज स्विच हिट मारतात. म्हणजे फलंदाज त्याची हाताची बाजू बदलून फलंदाजी करतात. आजकालचे फलंदाज यात निपुण आहेत. जवळजवळ 70-80% फलंदाज याचा कधीनाकधी याचा वापर करतात पण सर्रास असे फटके ग्लेन मॅक्सवेल, जोस बटलर हे काही फलंदाज खेळतात. पण तेसुद्धा एका डावात जास्तीतजास्त 4-5 वेळा,  कधी ऐकल आहे का की फलंदाज त्याची हाताची बाजू बदलून फलंदाजी केली. नाही ना ! पण असे झाले आहे आणि तेसुद्धा सुनील गावसकर यांच्याकडून. विश्वास ठेवा सुनील गावसकर यांनी डाव्या हाताने फलंदाजी केली आहे. ही गोष्ट आहे 1981-82 रणजी करंडक सेमी फायनलची मुंबई विरुद्ध कर्नाटक.  कर्नाटकचा डावखुरा फिरकी गोलंदाज रघुराम भट्ट यांनी हवेचा फायदा घेत मुंबई च्या फलंदाजांन विरुद्ध एक जाळ तयार केल होत, त्यांना खेळण जवळजवळ अशक्य झाल होत, भट्ट यांनी पाहिल्या डावात 8 गडी बाद केले होते. सामन्याचा लेखाजोखा पाहिल्या डावात गावस्कर यांनी उजव्या हाताने फलंदाजी केली होती. आणि तेही 41 धावांवर भट्ट ...