भारताने WTC फायनल 2023 का गमावली याची सहा कारणे आपण पाहुयात
क्रिकेट मराठीनुसार भारताने WTC फायनल 2023 का गमावली याची सहा कारणे आपण पाहुयात
![]() |
| virat kohli (ICC Twitter) |
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल 2023 लंडनमधील ओव्हल येथील अंतिम कसोटी ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांच्या मोठ्या फरकाने गमावली.
2021 मध्ये साउथॅम्प्टनमधील हॅम्पशायर बाउल येथे न्यूझीलंडकडून 8 विकेट्सच्या फरकाने पराभूत झाल्यानंतर WTC फायनलमध्ये टीम इंडियाचा हा सलग दुसरा पराभव होता.
ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देण्यासाठी ट्रॅव्हिस हेडला त्याच्या 163 धावांच्या अविश्वसनीय खेळीबद्दल सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पण अश्या प्रकारची एकही खेळी भारताकडून बघायला मिळाली नाही. त्यामुळे भारतीय संघ हरला अस म्हणत तरी वावग ठरू नये.
क्रिकेट मराठी नुसार भारताने WTC फायनल 2023 का गमावला याची सहा कारणे आपण पाहुयात.
पहिल कारण : तयारी
पराभूत झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माला जेंव्हा पराभवाची कारणे विचारली असता त्यात महत्वाचं कारण म्हणजे रोहित म्हणला"आम्हाला तयारी करण्यासाठी कमीतकमी 20-25 दिवस पाहिजे होते, अश्याप्रकरच्या फायनल साठी खुप तयारी लागते"
जर रोहित शर्माला या गोष्टी माहीत होत्या तर जस IPL मध्ये सुनिल गावसकर यांनी म्हणल्याप्रमाणे खेळाडूंनी IPL लवकर सोडुन WTC च्या तयारीला जावे. मग खेळाडूंनी तस का केल नाही.
रोहित शर्मा, विराट कोहली, आणि अजिंक्य रहाणे यासारख्या अनुभवी खेळाडूंना T20 खेळून कसोटी क्रिकेट मध्ये adjust करू शकता पण हिच अपेक्षा तुम्ही बाकी खेळाडूंकडून ठेवू नाही शकत. त्यातल्या त्यात गोलंदाजांकडून तर नाहीच नाही. या सर्व गोष्टी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कळायला पाहिजे होत्या. या तयारीत भारतीय संघ कमी पडला हे नक्की.
दुसर कारण : संघ निवड
संघनिवडीत सर्वात चर्चेचा विषय म्हणजे रविचंद्रन अश्विन कारण अश्विन कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. जगातील नंबर एकचा गोलंदाज आणि या WTC हंगामात भारतातर्फे सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज आणि त्यात कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे अश्विन फलंदाजीत सुद्धा उपयुक्त होता. ऑस्ट्रेलिया संघात असलेल्या नॅथन लियॉनने दोन्ही डावात मिळून 5 बळी मिळवले.
ऑस्ट्रेलियाच्या संघात 5-6 डावखुरे फलंदाज होते. आणि डावखुऱ्या फलंदाजां विरुद्ध अश्विन किती घातक आहे हे त्याचे रेकॉर्डस सांगतात. अश्विन क्रिकट मधिल एक हुशार खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्यामुळे रविचंद्रन अश्विनला न खेळवन भारताची घोडचूक ठरली
तिसर कारण : भारताची वरची फलंदाजी
क्रिकेट मराठी नुसार तिसर महत्वाचं कारण म्हणजे भारताची वरच्या फळीतील फलंदाजी . रोहित शर्मा, शुभमन गिल, चतेश्र्वर पुजारा आणि विराट कोहली ही आहे भारताची टॉप ऑर्डर फलंदाजी . या चारही फलंदाजांना फायनल मध्ये साध अर्धशतकही झळकावता आल नाही . बेजबाबदार फटके खेळल्यामुळे भारत पराभूत झाला. पाचव्या दिवशी विराट कोहली कडून अपेक्षा होत्या पण 6-7 स्टंपवर जाणारा चेंडू मारायचा मोह त्याला आवरला नाही. यातल्या प्रत्येक खेळाडूला चांगली सुरुवात मिळली होती पण त्याचा फायदा उचलता नाही आला.
चौथ कारण : कर्णधार रोहित शर्मा
कर्णधार रोहित शर्माने फायनल अगोदर कसोटीत केवळ 6 सामन्यात नेतृत्व केल होत त्यात सर्व सामने भारतात खेळले होते. त्यात 4 विजय तर 1 पराभव असा रेकॉर्ड आहे. त्यामुळे विदेशात नेतृत्व करणे आणि तेसुद्धा WTC फायनल मध्ये रोहित शर्माला जमले नाही. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यामुळे भारताकडे रोहित शर्मा पेक्षा दुसरा चांगला पर्याय नव्हता. हेड आणि स्मिथ मध्ये झालेल्या भागीदारीत भारतीय खेळाडूंनी खांदे टाकले होते.
पाचवे कारण : गोलंदाजांची भेदकता
लंडनमधील ओव्हल कसोटीदरम्यान ऑस्ट्रेलियाला दोनदा, तुलनेने स्वस्तात बाद करण्याची मोठी जबाबदारी भारतीय वेगवान गोलंदाजांवर होती, परंतु ते सातत्यपूर्ण विकेट्स घेऊ शकले नाहीत, विशेषत: पहिल्या डावात, षटकात सुमारे चार धावा देत असताना. WTC फायनलच्या ठराविक टप्प्यांवर मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी हे ऑस्ट्रेलियन फलंदाजांविरुद्ध चेंडूवर थोडेफार प्रभावी दिसले, परंतु एकूणच, भारतीय गोलंदाज एक युनिट म्हणून भेदक नव्हते.
सहावे कारण : संघ व्यवस्थापन
भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक परास म्हांब्रे, आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्याही तयारीत उणीवा जाणवून आल्या त्यांच्याकडे 163 धावा करणाऱ्या हेड विरूद्ध रणनीती न्हवती. आखुड टप्प्याच्या चेंडूवर अडचण येणारा खेळाडू 163 धावा करतो म्हणजे गोलंदाजी प्रशिक्षकावर याच खापर फुटल पाहिजे. यात द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक यांच नाव यायच कारण म्हणजे जर पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने रहाणे आणि शार्दुलला जीवनदान दिले नसते नो बॉल टाकले नसते तर कदाचित ऑस्ट्रेलिया 1 डाव राखून जिंकला असता. अजिंक्य रहाणे 17 धावांवर बाद असताना पॅट कमिंसचा बॉल नोबॉल ठरला. पण भारताच्या नशिबाने अस काही घडल नाही.

तसेच भारतीय निवड समितीचा हि या पराभवात मोठा हात आहे, दिड वर्षांपूर्वी अजिंक्य रहाणे ला वगळून निवड समितीने काय साध्य केले ?
उत्तर द्याहटवाअजिंक्य रहाणे ला वगळले याचा अर्थ समितीला अजिंक्य चा पर्याय सापडला होता कि काही राजकारण होते हे देव जाणे, परंतु ऐनवेळी अजिंक्य ला अंतिम सामन्यात संधी द्यायचीच होती तर मग त्याला तब्बल दिड वर्ष बाहेर बसवून निवड समितीने काय साध्य केले ?
तसेच रोहित शर्मा कडे कसोटी नेतृत्व देणे हि निवड समितीची घोडचूक ठरली.
Barobar
हटवा💯
उत्तर द्याहटवा