ट्रेंट बोल्टला एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी न्यूझीलंड बोर्डाकडून मिळाली खेळण्याची परवानगी

ट्रेंट बोल्टला एकदिवसीय विश्वचषक 2023 साठी न्यूझीलंड बोर्डाकडून मिळाली खेळण्याची परवानगी 



न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट सध्या आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे. 
बोल्ट हा टूर्नामेंटमधील सर्वात भयंकर गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याची स्विंग गोलंदाजी शीर्षस्थानी आहे. दरम्यान, त्याने आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची न्यूझीलंडकडून खेळण्याची अजूनही इच्छा असल्याचे बोल्ट म्हणाला होता. कुटुंबासोबत आणि क्लब क्रिकेटसाठी वेळ घालवण्यासाठी बोल्टने ऑगस्ट 2022 मध्ये न्यूझीलंड बोर्डासोबतचा वार्षिक करार सोडण्याचा निर्णय घेतला होता.

 ट्रेंट बोल्टने 2022 मध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर तो फक्त क्लब क्रिकेट आणि कुटुंबासोबत वेळ घालवत होता. त्याने 'ESPNcricinfo' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याला अजूनही न्यूझीलंडकडून खेळायचे आहे. 

 बोल्ट म्हणाला, “मला अजूनही न्यूझीलंडसाठी खेळायचे आहे आणि ही माझी मोठी इच्छा आहे. मी नशीबवान आहे की मी 13 वर्षे न्यूझीलंडकडून खेळलो आणि मला 2023 च्या विश्वचषकातही खेळायचे आहे. बघू पुढे काय होतेय ते"


2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाची आठवण करून देताना, गोलंदाज म्हणाला, “मला 2019 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यानंतर केन विल्यमसनने सांगितले होते की आम्हाला 2023 मध्ये भारतात परत यावे लागेल. आम्ही एक महान एकदिवसीय संघ आहोत. आमच्याकडे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी भारत दौरा केला आहे आणि त्यांना येथील परिस्थिती समजते. हा अनुभव वर्ल्डकपमध्ये कामी येतो. तुम्ही अनुभव विकत घेऊ शकत नाही आणि वर्षानुवर्षे भारताचा दौरा करणाऱ्या खेळाडूंना तुम्ही बदलू शकत नाही.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या दुखापतीबाबतही चर्चा झाली. IPL 2023 च्या सुरुवातीला गुजरात टायटन्सकडून खेळताना क्षेत्ररक्षण करताना विल्यमसनला दुखापत झाली होती. बोल्ट म्हणाला, “त्याच्या गुडघ्यासोबत जे काही घडत आहे ते चांगले नाही, पण तो तिथे जाण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. ही एक उत्तम स्पर्धा आहे. 100 टक्के मला तिथे रहायचे आहे."

न्यूझीलंडने केंद्रीय कराराच्या यादीत असलेल्या खेळाडूंना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने बोल्टला बर्‍याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटला मुकावे लागले आहे. आगामी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये बोल्टच्या सहभागावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. 
तथापि, SENZ रेडिओनुसार, न्यूझीलंड क्रिकेटचे CEO डेव्हिड व्हाईट यांनी एका संभाषणात पुष्टी केली आहे की ट्रेंट बोल्ट 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहे. केन विल्यमसन जखमी झाल्यामुळे, बोल्ट हा या स्पर्धेत न्यूझीलंडचा मुख्य आधार आणि टीम साउथी नंतर संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. 

त्यामुळे आता ट्रेंट बोल्ट 2023 एकदिवसीय विश्वचषकात खेळण्यासाठी तयार आहे, बोल्टच्या घातक गोलंदाजीचा किवी संघाला एक मजबूत आणि भक्कम आधार राहील हे मात्र नक्की.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेशिस्तपणा भोवला, हरमनप्रीत कौर 2 सामन्यांसाठी निलंबित

"मी भारतात जाणार नाही, कोणतीही शक्यता नाही" मोइन अली

जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन, आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपदी निवड