कोरोना व्हायरस आणि जागतिक क्रिकेट वर झालेला परिणाम 😷😷

कोरोना व्हायरस आणि जागतिक क्रिकेट वर झालेला परिणाम 😷😷

लेख गजानन भुमरे 




नुकत्याच जगात थैमान घातलेल्या रोगाचं नाव म्हणजे कोरोना व्हायरस. चीन पासून सुरुवात झालेल्या या घातक विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर या रोगाने परिणाम केला आहे. सर्व जगाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

         यातून क्रीडाक्षेत्रही बचावलेला नाही.जगातील प्रत्येक खेळाला या रोगाचा फटका बसला आहे. जगातील मोठमोठ्या लीग या रोगाच्या भीतीने रद्द केला किंवा पुढे ढककल्या आहेत.
जगातली नावाजलेली NBA बास्केटबॉल लीग सुद्दा या कोरोना व्हायरस मुळे रद्द करावी लागली. याचा परिणाम फुटबॉलवरही झाला व मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय सामने रद्द करावे लागले.याव्यतिरिक्त इतर सर्व खेळांनाही कोरोना व्हायरस चा जबरदस्त फटका बसला.
 
आता आपण जाणून घेणार आहोत की क्रिकेटवर कोरोना व्हायरस चा काय परिणाम झाला.
भारतात कोरोना व्हायरस अगोदरच दाखल झाला होता,पण त्याची तीव्रता एवढी नव्हती की क्रिकेटचे सामने रद्द करण्यात येतील.भारतात सर्वात पहिल्यांदा कोरोना मुळे सामना रद्द करण्याची वेळ भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका च्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आली. यापूर्वी मालिकेतील पहिल्या सामन्यात या विषाणूची बाधा आलेली नव्हती,पण पावसामुळे हा सामना रद्द करावा लागला.यानंतर भारत सरकारच्या लक्षात आले की हा विषाणू फार वेगाने पसरत आहे.त्यामुळे भारत सरकारने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा व तिसरा सामना रिकाम्या स्टेडियम मध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला व नंतर पुढच्याच दिवशी हा निर्णय बदलून उरलेली दोन्ही सामने रद्द करण्यात आले. 
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मालिकाही मोकळ्या मैदानात खेळवण्यात आली आणि यात खेळाडूंनी हस्तांदोलन करण्याचे टाळले.
    
इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने श्रीलंका दौऱ्यागोदर कोरोना व्हायरसमुळे इंग्लंड चे कोणतेही खेळाडू श्रीलंकेच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाही असे पत्रकार सभेत स्पष्ट केले. श्रीलंका दौऱ्यावर आलेल्या इंग्लंड संघाचा नेमकच सराव सामना सुरू होता,तेवढ्यात इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून मायदेशी परतण्याचे आदेश आले. इंग्लंडच्या खेळाडूंनी सराव सामना अर्धवट सोडून मायदेशात रवाना झाले. इंग्लंड चा श्रीलंका दौरा सुरूही झाला नव्हता,मात्र इंग्लंड क्रिकेट बोर्डाने हा दौरा रद्द केला.

पाकिस्तान मध्ये सुरू असलेल्या PSL वरही कोरोना ने आपला प्रभाव दाखवला. गटसाखळीतील सर्व सामने लवकर समाप्त करण्यात आले. PSL चे उपांत्य फेरीतील सामने ठरलेले असताना PSL च्या संयोजकांना उपांत्य फेरीतील सामने पुढे ढकलावे लागले..

आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रमाणेच याचा परिणाम भारतीय घरेलू क्रिकेटवरही झाला.भारतीय क्रिकेट बोर्डाने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यानंतर सर्व घरेलू सामने रद्द केले.

अश्या प्रकारे कोरोना व्हायरस पसरण्याचा भीतीने क्रिकेट क्षेत्रात  कोरोना पुढे सर्वाना माघार घ्यावी लागली.आपण आशा करूयात की या घातक विषाणूवर लवकरात लवकर तोडगा निघावा आणि क्रिकेट पूर्वीप्रमाणे सर्व पातळीवर सुरळीत चालावे.

आम्ही IPL वरही विशेष माहिती पुढच्या ब्लॉगवर उपलब्ध करणार आहोत. तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की comments करा 👍

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेशिस्तपणा भोवला, हरमनप्रीत कौर 2 सामन्यांसाठी निलंबित

"मी भारतात जाणार नाही, कोणतीही शक्यता नाही" मोइन अली

जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन, आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपदी निवड