वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात विश्वविजेत्यांना दणका, भारतीय महिला संघाची जबरदस्त कामगिरी
महिला टी-20 वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाच्या महिला संघावर 17 धावांनी दणदणीत विजय मिळवून वर्ल्ड कपचा विजयी शुभारंभ केला लेख गजानन भुमरे शुक्रवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या भारतीय संघाने चार षटकांमध्ये 40 धावांची दमदार सलामी दिली, यानंतर पाचव्या शतकात स्मृती मनधना फटकेबाजी च्या नादात बाद झाली,तर पुढच्याच षटकात दमदार फलंदाजी करीत असलेल्या शेफाली वर्माला एलिसा पेरीने माघारी धाडले यापाठोपाठ भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर स्वस्तात तंबूत परतली. दीप्ती शर्मा व जेमीमाह रॉड्रिगेस यांनी संयमी फलंदाजी करीत भारताचा डाव सावरला. अर्धशतकी भागीदारी झाल्यानंतर जेमीमाह तंबूत परतली. दीप्ती शर्माने एक बाजू लावून धरत 49 धावांवर नाबाद राहिली. ऑस्ट्रेलियाकडून जेश जेनासन हीने दोन गडी टिपले, तर एलीस पेरी आणि किमींस यांनी एकेक गडी टिपला. निर्धारित 20 षटकात भारतीय संघाने 132 धावा केल्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने पावर प्ले मध्ये संयमी सुरुवात केली. शिखा पां...