पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोरोना व्हायरस आणि जागतिक क्रिकेट वर झालेला परिणाम 😷😷

इमेज
कोरोना व्हायरस आणि जागतिक क्रिकेट वर झालेला परिणाम 😷😷 लेख गजानन भुमरे  नुकत्याच जगात थैमान घातलेल्या रोगाचं नाव म्हणजे कोरोना व्हायरस. चीन पासून सुरुवात झालेल्या या घातक विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगातल्या प्रत्येक गोष्टीवर या रोगाने परिणाम केला आहे. सर्व जगाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.           यातून क्रीडाक्षेत्रही बचावलेला नाही.जगातील प्रत्येक खेळाला या रोगाचा फटका बसला आहे. जगातील मोठमोठ्या लीग या रोगाच्या भीतीने रद्द केला किंवा पुढे ढककल्या आहेत. जगातली नावाजलेली NBA बास्केटबॉल लीग सुद्दा या कोरोना व्हायरस मुळे रद्द करावी लागली. याचा परिणाम फुटबॉलवरही झाला व मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय सामने रद्द करावे लागले.याव्यतिरिक्त इतर सर्व खेळांनाही कोरोना व्हायरस चा जबरदस्त फटका बसला.   आता आपण जाणून घेणार आहोत की क्रिकेटवर कोरोना व्हायरस चा काय परिणाम झाला. भारतात कोरोना व्हायरस अगोदरच दाखल झाला होता,पण त्याची तीव्रता एवढी नव्हती की क्रिकेटचे सामने रद्द करण्यात येतील.भारतात सर्वात पहिल्यांदा कोरोना मुळे सामना रद्द करण्...

सेमीफायनल मुकाबला भारतासाठी जाणार अवघड भारतासमोर आहे कोणते संकट

इमेज
सेमीफायनल मुकाबला भारतासाठी जाणार अवघड भारतासमोर आहे कोणते संकट  लेख गजानन भुमरे  भारतीय महिला संघाने T20 वर्ल्ड कप 2020 मध्ये जबरदस्त कामगिरी करताना वर्ल्ड कप च्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केला आहे. अ गटातील सर्वच्या सर्व म्हणजे चार सामने जिंकून भारतीय महिला संघाने गटात अव्वल स्थान पटकावले. पाहिल्या सामन्यात भारतीय संघाने पूनम यादवच्या शानदार फिरकीमुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवून लावले, तर दुसर्‍या सामन्यात शेजारी बांगलादेशला 18 धावांनी पराभूत केले. तिसर्‍या सामन्यातही भारताला प्रथम फलंदाजी मिळाली रंगतदार झालेल्या सामन्यात केवळ 3 धावांनी न्यूझीलंड वर रोमांचक विजय मिळविला. चौथ्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताला प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाली या मॅच मधेही भारतीय महिलांचे वर्चस्व राखत 7 विकेट ने दणदणीत विजय मिळविला.  आता भारतीय संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला आहे. भारतासमोर इंग्लंड चे आव्हान आहे. आणि भारतासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे.ते संकट म्हणजे आतापर्यंत भारताने सेमी फायनल मधे कधीही विजय मिळवला नाही. टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त...